क्षुधित,
तू एक श्वान आहेस..क्रुद्ध आणि दुष्ट...
तुडुंब अन्नग्रहण आणि तू होतोस, मृतवत..
पडून रहातोस अचेतन, दगडासारखा, बधीर..
काही वेळा श्वान, काही वेळा शवासमान...
सिंहासमवेत तू कसे धावावेस; संतांचे अनुकरण तू कसे करावेस???
सुफी संत मौलाना जलालुद्दीन रुमी यांचे हे शब्द..
ए.पी.जे. कलाम यांच्या अरुण तिवारींनी लिहिलेल्या संवादात येतात.
कमलेश वालावलकरांनी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेला हा अनुवाद वाचताना..
मी घाबरलो
...हे संत म्हणजे चाबूक हातात घेतलेल्या कडकलक्ष्मीसारखे.
खांद्यावर घेतील आणि मग हातातला आसुड आपल्या श्रोणीपॄष्ठावर बसतो..

[shroniprushtha- sanskrit word for the seat]
संतसाहित्य वाचताना त्या साहित्यात विचारांच्या अर्धवट बैठकीवर सरळ सरळ कोरडे मारलेले दिसतात..

या ओळी वाचून क्षणभर माझी भूकच मेली राव..

शवासारखा पडुन होतो कितीतरी वेळ..

रोज योगसनात शवासन करताना वेगळं वाटतं
पण या शवासनात अंतर्दॄष्टी उघडली..
कबीर सुद्धा अस्स्स्सेच...
त्यांची भाषा परखड..
"गुरु कुम्हार शिस कुम्भ है। गढ गढ काढै खोट।
अंतर हाथ सहार दे, बाहर मारै चोट॥..."
गदिमांनी या काव्याला सुंदर मांडलं आहे..
मराठीत..
"कुंभारासारखा गुरु नाही रे जगात।
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात॥"
या ओळीत धपाटा हा पदार्थ खाण्यात किती महत्वाचा आहे हे ग दि मां नी सांगितले आहे.

आधी तुडवी मग हाते कुरवाळी..
ओल्या मातीच्या गोळ्याला मग येई आकॄती वेगळी..
घट जाती थोराघरी, घट जाती राउळात..
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात॥
कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ।
देता आकार गुरुने, ज्याची त्याला लाभे वाट।
घट पावती प्रतिष्ठा, गुरु रहातो अज्ञात।
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात॥
गुरुचे धपाटे खाऊन जीवनात चव येते असा महत्वाचा विचार मी या गाण्यातून शिकलो.
गजानन वाटव्यांनी गाईलंय हे गीत..
मराठी भावगीतांच्या दुनियेचे जे अप्रतिम तारे मराठी गानविश्वाला लाभले त्यात, गजानन वाटवे अग्रभागी आहेत.
"मी निरांजनातील वात".. हे भावगीत अप्रतिम आहे त्यांचं..
कबीरजी म्हणतात-
कबीर कहे कमाल को, दो बाता सीख ले..कर साहिब की बंदगी, और भुखे को कुछ दे....

हे वाचल्यावर कुठं मनाला हायसं वाटलं..
"भुखे को कुछ दे.."
कबीर खाण्यावर प्रेम करत असत...
आवडलं बुवा आपल्याला...
आमच्या कुटुंबाला मी काल कबीराची एक कथा ऐकवली..
एक साधक कबीराकडे गेला आणि म्हणाला..
मला ध्यान करायचे आहे.
मला चैतन्याचा शोध घ्यायचा आहे.. मला मार्ग सांगा..
कबीरजींनी त्यांच्या बेटर हाफ ला हाक मारली.
मंडळी घरात आणि कबीरजी अंगणात..
जोरात हाक मारली..

" अहो बेटर हाफऽऽऽऽ .. जरा कंदील घेवून याऽऽऽऽऽऽ मला इथं अंधारात काही दिसत नईऽऽऽऽऽऽये"...

ऐन दुपारची वेळ.. लक्ख प्रकाशात कबीर चक्क खोटे बोलले.

तेही स्वतःच्या बायकोला..

याला म्हणतात डेरिंग...
कबीर रॉक्सऽऽ यू नोऽऽऽऽ... 
कुटुंब लगेच कंदील घेऊन हजर..
मग ते म्हणाले... "आता कंदीलातील वात जरा मोठी करा.. मला दिसत नाहीऽऽऽऽऽऽ!!!"
"
कुटुंबानं लगेच कंदीलाची वात मोठी केली.. 
हे सारे बघून तो तरूण गोंधळून गेला...
पण अत्यंत महत्वाचं म्हणजे कबीरजींचं नशीब थोर की स्त्रीमुक्ती संघटनेचा मोर्चा आला नाही..कबीराघरी..


"थँक राऽऽऽऽम........ ओह नोऽऽऽ.. हाउ रिडिक्युलस वूड हॅव बीन दॅट, नाऽऽऽऽ"...
कबीर वाचले या प्रकारतूनऽऽऽ
त्याला उत्तर न देता, कबीर आपल्या घरात परत निघाले...
तो तरूण कळवळला आणि म्हणाला " माझ्या प्रश्नाचं उत्तर????"
कबीरजी म्हणाले" मी अलरेडी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय..
अशी जेव्हा सहचारिणी असते तेव्हा हा आत्म्याचा शोध पूर्ण होतो..
अन्यथा..
सॉलोमन ग्रॅंडी बॉर्न ऑन मंडे, डाईड ऑन सॅटर्डे..."
कुटुंब चिडून म्हणालं, मेलंऽऽऽ, चला उगाच मला चिडवू नका!!!
मी धपाटे केलेत आज.. लोणीसुद्धा आहे...
कबीराची ष्टोरी लय पॉवर्फुल्ल.. लय पॉवर्फुल्ल.. लय पॉवर्फुल्ल..
कुटुंबाचा आवाज खाली आलाय..
SO LEMME ENJOY THE DHAPATE

चलो सी या..
निघतो आता..
हॅप्पी कबीर...

0 comments:
Post a Comment