Tuesday, December 2, 2008

गोडावले मुख, तुका म्हणे

मंद मेलडीच्या सुरात धुंदावलेल्या कॅंडललाईट डिनर पेक्षा, आकाशात उडणारी रानपाखरं पहात शांत सावलीत बसावं. हातावर कडक भाकरी घ्यावी त्यावर मस्त ठेचा आणि दही आणि विश्वकर्म्याचं चित्र पहात "हरिचिंतने अन्न सेवीत जावे." यासारखी मौज नाही. भंडा-याच्या डोंगरात रानोमाळ भटकत वॄक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणणारे तुकोबा मग उमजून जातात.

"हरीकथा भोजन, परवडी विस्तार, करोनि प्रकार सेवू रुचे। तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणासी॥

बघा , तुकोबारायांनी किती प्रकार करुन जेवू घातलं आहे. महाराष्ट्र खरा काय हे कळायचं असेल तर हा एकांताचा सहवास घडला पाहिजे. एकांतातच आपली आपल्याला भेट होते. विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख, गोडावले मुख, तुका म्हणे। अश्या एकापेक्षा एक रेसीपीज संतांनी करुन वाढल्या आहेत. पण हातातल्या काड्या आणि त्यातून ओरपलेल्या नूडल्स मधून आपल्याला वेळच मिळत नाही. बघा आकाश कसं मस्त दिसतंय. आणि कुठल्याच विचारांनी न भारावलेला तो पक्षी कशी मस्त शीळ घालत गिरकी घेतोय... हॅप्पी वनभोजन.. c ya..

No comments: