

म्हणजे मी फक्त ऐकत असतो आणि आवश्यक तिथे अनुमोदन देत असतो.
कारण काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळालं त्याचा संसार, सुखी माणसाचा सदरा घातला नसून सुद्धा सुखाचा होतो


मी भक्तीभावाने श्रवणास बसलो. नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती म्हणजे श्रवण... तेदेखील एकलेनि अवधान देईजे असे....
बायको उवाच- श्रुणू हे नरश्रेष्ठं,आजोबां आजारीं भवेत..

संस्कृतचा व्यासंग नसणा-यांसाठी, मराठीत सांगतो..
"अहोऽऽऽऽऽऽऽऽ, आजोबांना डॉक्टर कडे न्या. त्यांना दिसत नाही नीट. पण ऑपरेशन करुन घेणार नाही म्हणताहेत..

मोतीबिंदूचे ऑपरेशन करायला तयार नव्हते.
पण शेवटी तयार झाले .
एका अटीवर, " मला रोज एक तास, मला जे ऐकावे वाटेल, तो ग्रंथ ऐकवायचा!
विद्यार्थ्यांना, वर्गात शिकवताना ओरडतोस तसं नाही

तर नीट शांत कळेल असं वाच.
मी पण तयार झालो. चला चार गोष्टी माझ्या आबु (अडाणी बुद्धीला )कळतात तरीऽऽ!

कुटुंब खुश झालं..
"मेलं,सारखे खाण्याचे विचार..त्यापासून थोडीफार मुक्ती मिळेल, वाचाऽऽ नीट".

हे कै आमच्या कूटुंबाचे स्वगत नै.... जाहीर खणखणीत टोमणा

आजोबांची ऑर्डर - आज अष्टावक्र गीता वाच.
हे अष्टावक्र म्हंजे डेरिंगबाज बरंऽऽऽ..
आठ ठिकाणि वक्र शरीर घेऊन गेले जनकराजाच्या सभेत.
तिथं जनकाचे सारे कार्यकर्ते..
( मी चमचा अस्सं देवाशप्पत म्हणालो नाही. कार्यकर्ता असं म्हणतोय. आपल्याला अण्दोलणाचं लय भ्या वाटतं रावऽऽ, गळ्याशप्पत..)
जनकाचे कार्यकर्ते अष्टावक्राचं वाकडं शरीर बघून फिदीफिदी हसले.
अष्टावक्र पण काय कमी नाय.आण्णा हजारेच दुसरेऽऽ ...
सरळ राजाला म्हणाले. तुझी सभा चामड्यावरून माणसाची परीक्षा करते. बूट-चपला शिवायची यांची लायकी. येस्स्स्स्स .. आप्ल्याला ष्टोरीचा प्लॉट लय आवडला राव.
आमच्या दीदीला ही गोष्ट सांगतोच. ती सध्या पुस्तक लिहीते आहे. आयुष्याच्या मंथनावर, "नवनीत" नावाचं.. ती चिडते पटकन्न




लगेच आजोबांना कबूल केलं "अष्टावक्र गीता वाचतो तुमच्यासाठी"

टोटल पुस्तकात खरं सांगतोय - बाकी काय कळालं नाय.

डोक्यावरनं सर्कल ला टॅंजेंट गेली, इंटर-सेक्षनच नाय मेंदू बरोबर..

hmm पण एक श्लोक जाम आवडला, लय भारीऽऽऽ.
सुखामास्ते सुखं शेते, सुखमायाति याति च।
सुखं वक्ति, सुखं भुक्ते, व्यवहारेऽपि शांतधीः॥
त्या पुस्तकात अर्थ दिलाय म्हणून बरंय..

well.... अर्थ सांगतो - शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो. येतो सुखाने, जातो सुखाने, बोलतो सुखावणारे-आणि


या एका शब्दामुळं आपण फॅन झालो अष्टावक्राचे...
सुखाचे भोजन करतो.. सुखं भुक्ते..
दुसरे दिवशी आजोबांची आज्ञा- आज गाथेतला अभंग वाच. काय म्हणावं या आजोबांना???

एखादं मासिक वाचून दाखव म्हणावं..
ते दिलं सोडून अन गाथेतला अभंग वाच...
चला वाचावे. महाभारतात युधिष्ठीराला उपदेश आहे- वॄद्धांची सेवा करावी आणि आशीर्वाद घ्यावेत..त्यात कर्मसिद्धीचं बीज आहे..
चला रमणजी वाचाऽऽऽ बरं!(हे स्वगत आपलं..)
शब्दांची रत्ने करुनी अळंकार। तेणे विश्वंभर पुजियेला॥
भावाचे उपचार "करुनि भोजन" तेणे नारायण जेवविला॥


बायको आणि दोन्ही चिरंजीव एकत्रित पणे उचुः (उवाच चे अनेक वचन) - बघा hmm कसे खायच्या ओळी फक्त लक्ष देवून वाचतात...
सारखं खा खाऽऽ

खा खाऽऽ

खा खाऽऽ

खा खाऽऽ
असोऽऽ अपमान सांगू नये म्हणतात ना!
काळ देहासी आला खाओऽऽऽ, आम्ही आनंदे नाचू, गाऊ॥
लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह... यू नो!
बाबूमोशायऽऽऽ हम सब रंगमंच की कठपुतलीयां है रेऽऽऽ..

आजोबांना अजून बरंच वाचून दाखवायचं आहे.
त्यांना, त्यांची शाल सापडत नाही.
ऑपरेशन झालंय डोळ्याचं..
चालायचंच... चला ती आधी शोधतो.
हॅप्पी विंटर. काळजी घ्या तब्येतीची आणि दोन चमचे, सॉरी, दोन कार्यकर्ते

नवनीतकार, दीदीसाठी मध पण न्यायचे आहे. तिच्य़ा जीभेला गोडवा तरी येईल.


C ya.. bye.
No comments:
Post a Comment