Monday, December 1, 2008

चव घेऊन खावं आणि षड्ज लावून गावं

चव घेऊन खावं आणि षड्ज लावून गावं

कदाचित ग्रेसांच्या मैत्रीचा परिणाम पण ह्र्दयनाथ काका असं काही बोलून जातात की ते आमच्या बाबु(बाल बुद्धी)ला कळत नाही. परवा लिटील चॅंप्स ना ते म्हणाले की सा, रे,ग,म.... यापैकी दोन सलगच्या स्वरांत काय आहे हे कळाले की संगीत कळलं. आमचे कॉलेज चे मॅथ्स टीचर पण असंच न कळणारं काही बोल्ले होते. म्हणाऽऽऽऽले, दोन फायनाईट नंबर्स च्या मध्ये इनफायनाईट नंबर्स असतात. मी यावर बरेच डॊके चालवले आणि या निष्कर्षाप्रत आलो की आयुष्याची खरी चव कळायची असेल तर दोन घासांमध्ये असणारा काळ आपण चवमग्न झालो पाहिजे तर मग चोचल्यांची ओळख होते. उगाच आपलं बका बका हादडत रहायचं याला काय अर्थ आहे? चव घेऊन खावं आणि षड्ज लावून गावं... तुरट स्वर वर्ज्य करावेत उत्साहाचा मधूर आरोह अन विमनस्कतेचा कटू अवरोहपण घ्यावा. मग अशी दाणेदार तान येते की "उत्तुंग नाट्यशिल्प" आठवतं!!!हुरहुर लावणारा मारवा चटणी कोशिंबीरी सारखा आणि कर्मकौशल्याची भैरवी कॄतार्थ अन तॄप्त होईपर्यंत ताटात घ्यावी!आत्मविश्वासाचा "दरबारी कानडा" रंगला की आक्खी दुनिया कानसेन और आप्पुऽऽऽन बोलेतो तानसेन.. चाव, सी या ...हॅप्पी महफिल...

No comments: