Wednesday, December 3, 2008

ऐतिहासिक उहापोहात..

कॉन्स्टॅन्टीनोपल वर तुर्कांचा ताबा रहावा असे रशियाचे मत का असावे???? अश्या महत्वपूर्ण ऐतिहासिक उहापोहात प्रा.बाबूराव गुंतले असताना, त्यांच्या सहधर्मचारिणीने त्यांना कल्पना दिली, "अहो, रमणभावोजी आलेत".

एवढ्या सकाळी मी घरी का बरे आलो असेन? याचे तार्किक दस्ताऐवज मिळतात का असा प्रयत्न न केला तर बाबूराव इतिहासाचे प्राध्यापक ते कसले?
रा. रा. बाबूराव पुन्हा विचारात गढून गेले व दरम्यानच्या काळात वहिनींनी आम्हा दोघांना पोह्यांची एकेक प्लेट दिली.

कुटुंबवत्सल आदरणीय श्री आदेश बांदेकर जर या वहिनींच्या हातचे पोहे खातील तर एकेका चमच्याला एकेक शंभर रुपयांची नोट बक्षीस देतील(संदर्भ-होम मिनिष्टर नावाचा कार्यक्रम. आजकाल आपण संदर्भ देत अस्तो कारण भारतात बौद्धिक संपदेचा पूर येणार असे आमच्या एका मित्राने सांगितले आहे.) आणि पिळगावकरांचे सचिनदादा(यांचं वयच कळत नाय राव??म्हणून दादा म्हटलं)प्रत्येक घासागणिक "एक्कापेक्षा एक बेबी" म्हणत , अशी ही टेस्ट भारीऽऽऽ म्हणत नाचतील.अवधूतदादा गुप्ते तर प्रत्येक चमच्याला "तुम्ही चाबूक पोहे बनवले वहीनी, हा घ्या पुढच्या सप्तकातला नी" अस्सं प्रत्येक घासाला म्हणतील. असोऽऽ.

भावोजी आणखी घ्या थोडे पोहे. या शब्दांनी माझी चव-चिंतनाची धुंदी उतरली.

मी नको नको म्हणतोय हा केवळ एक औपचारिक भाग आहे हे न समजण्याइतके बाबूरावांचे कुटुंब बावळट नाही. ऊगाच इतिहाससंशोधकांच्या सोबत अठरा वर्षांचा संसार केला नाय या माउलीनं. kudos.

पोहे या विषयावरून मी सहजच बाबूरावांना म्हणालो," बाबूराव, डिड यू नो धिस, की पोहे भारतात द्वापरयुगात पण होते. सुदामा घेऊन गेला होता कॄष्णासाठी, पोरबंदरहून. आणि आज भारतात सर्वात उत्तम पोहे तिथेच मिळतात. ते ऐकून बाबूराव खेकसले, म्हणाले, तुमची पुराणातील वांगी इथं इतिहासात चालत नाहीत हो! इथं पुरावे लागतात.

पोहे खाणे अजून संपले नसल्यामुळं मी बाबूरावांना म्हणालो, "असोऽऽऽ, मात्र वहिनी पोहे उत्तम बनवतात".
पुन्हा बाबूराव याचा पुरावा कुठे मिळतो या चिंतनात मग्न झाले. मी मात्र हा पुरावा प्लेट मधून संपवल्याशिवाय ऊठणार नाही. असोऽऽऽ, हॅप्पी पोहे.. c ya..

No comments: