Sunday, December 7, 2008

गुप्त राहोनि उदंड करावे

"लीम यान चे" नावाचे एक चायनीज हॉटेल, माझ्या खाद्यप्रवासात, अचानक दास्तानों के दिलचस्प मॊड पर भेटले. जॅकी चान च्या शाओलिन टेंपल विषयी ज्या भावना आहेत त्याच माझ्या चायनीज रेस्तरॉंविषयी असतात. काउंटर वरील माणसास पाहून तो चीनी असावा असा माझा खात्रीशीर समज झाला आणि तो तितकाच पटकन मोडला. माझा बालमित्र चंदू, सध्या चीनी भाषेवर चिंतन करत असतो म्हणून त्याला दुकानाच्या पाटीचा अर्थ विचारला. चंदू म्हणाला या हॉटेल चे मालक लिमये आडनावाचे गॄहस्थ आहेत म्हणून रेस्तरॉंचे नाव लीम यान चे....असोऽऽऽऽ

बघा, अश्या प्रकारेऽऽऽऽऽऽ, देशाटन केल्यामुळे ज्ञानात कसली कसली विलक्षण भर पडत असते!!!!!! आणि नवनवीन पदार्थांची ओळख होत असते. प्रापंचिकानं उदंड देशाटन तर करावं परंतु साधू हिंडता बरा असं या देशाचं मुख्य तत्वज्ञान आहे. आस्था, संस्कार इत्यादि वाहिन्यांवरील साधू फिरतात पण "ग्लॅमरानंद बनून"....गुप्त राहोनि उदंड करावे हा दासबोधाचा महंतलक्षणाचा उपदेश अंगी बाणलेलाच दिसतच नाही. असोऽऽऽ

इतिहास हा विषय तसा आमच्या "असा ससा बु"(अतिसामान्य सर्वसामान्य बुद्धी)ला कळ्ळाऽऽऽच नॉय कधी.तहाची तात्कालीन कारणे, ऊठावानंतरचे चित्र आणि उठावाचे सामाजिक संदर्भ अश्या गोष्टी डोक्यात कधी शिरल्या नाहीत. शेवटी तो नाद सोडला.

मी आणि माझा मित्र चंद्या, दोघंही चायनीज मधील व्हेज मंचुरिअन चे दर्दी..

मंचुरिअन खात असताना, माझ्यासारख्या खाद्य-व्यासंगी विचारवंतास सुद्धा न सुटलेले एक कोडे आहे.
त्याची चव नेमकी काऽऽय?
नेमकी त्याची चव काऽऽय?
चव त्याची नेमकी काय?
काय बरं त्याची नेमकी चव??

कळत नाय ना?? जाऊदे, नाद सोडाऽऽ आणि समोरची डिश चव घेऊन खा...

चायनीज खाऊन चंद्याच्या फ्लॅटवर परत आलो. रात्री निवांत , सॅटेलाईट रेडिओ ऐकताना, गाणे कानावर पडले.. " देह देवाचे मंदीर, जश्शी दुधात हो साखर, तैसा जगी हो परमेश्वर.... " परत मी विचारात पडलो..Then I got it, दुधात साखर मिसळलेली असली की दिसत नाही पण दुधाला चव तिच्यामुळंच.

By the way, या दुधावरनं गीतामावशीची आठवण झाली.. माय मरो, मावशी जगो अशी एक मराठीत म्हण आहे. गीतामावशीला भेटून तुम्हाला पण अस्सेच वाटेल. कोजागिरीला असं काही आटीव दूध बनवते की चंद्राकडून दुधात नाही तर उलट चंद्राकडे, त्याकडून औषधी गुणधर्म जावेत..kudos..Hats off...आणि स्वाध्याय परिवाराला वाहून घेतलेलं. जय योगेश्वरऽऽऽऽऽऽ असं खणखणीत आवाजात म्हणत असते. मला लहानपणीच या मावशीनं आपल्या पदरात घेतलं.

मावशी एकदा म्हणाली, नीट बघ बाळा....गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "इति गुह्यतमं शास्त्रं.." असं म्हटलं आहे. हे शास्त्र नुसतं गुह्य नाही, गुह्यतर नाही.. तर गुह्यतम आहे.पॉजिटीव्ह नाही, कंपॅरिटीव्ह नाही, सुपरलीटीव्ह डिग्री आहे.. "इति गुह्यतमं शास्त्रं.." तत्वज्ञानाची भाषा गूढ असते. कॄष्ण जसा गूढ आहे तसा..

आपल्या जीवलग मित्राला , शस्त्र उचल, षंढासारखा वागू नकोस, आणि भीष्मासारख्या तपस्वी आजोबावर सुद्धा शस्त्र उचल असं म्हणणारा कॄष्ण "अहिंसा सत्य आणि अक्रोध" हे दैवी गुण आहेत असे म्हणतो तेव्हा "कानडा" म्हणजे दुर्बोध होवून जातो. कळत नाही. जेव्हा तुला गीता अशी दुर्बोध वाटेल तेव्हा डोळे मिट अथवा न मिट, पण त्या कानड्याची मनापासून प्रार्थना कर. गुह्यतम असणारा हा ग्रंथ मग कसा छान कळतो बघ!!!

कश्श्श्श्शीऽऽऽऽऽ ग्रेट की नाय आमची गीतामावशी..

आय टी पार्कात "गीता सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमीटेड जर काढले" तर सारे आय टी प्रोफेशनल्स "आपण सारे अर्जून" म्हणतील.. असोऽऽऽ पण मंचुरिअन ची चव गीतामावशीला पण अजून सांगता आली नाय..

बाय द वे "हॅप्पी गीता जयंती".. C Ya. bye.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

भन्नाट लेखन.

आपल्याला उत्तम चायनीस जेवण जेवायचे असेल तर "मेनलॅड चायना" मधे जरुर जाणॆ

रमण ओझा said...

Mana:purvak Dhanyawad, Harekrishnaji.
Mainland China cha yog lavakar yevo ashi prarthana...
karan,Maze Punyaalaa far frequent jaane yene hot naahi. 3-4 mahinyaat ekhadi Dhawati bhet hote. Thank you very much.