Monday, December 8, 2008

पाणीपूरी

पाणीपूरी

अंतोबा आपलं मैतर हाय साळंपास्नं ! आता ते गेलंऽऽऽऽ पुन्याला आन हामी आडानी हीतं मराट्वाड्यातच !! खेडयाचं आलं येडं, अन भज्याला मनतंय पेडं. हामची लईऽऽऽ ट्रॅजीडी, झाली की रावऽऽऽ.

(स्वगत- ग्रामीण साहित्य-व्यासंगाचा हा परिणाम काय बरे? आता भाषा सुधारणेसाठी काय बरे करावे??) असोऽऽऽ!!!

मुद्याकडे वळतो. अंतोबा नेहेमी मला तुकोबांची गाथा वाचायचं हे तुझं वय नाही मित्रा, वपु वाच, पुलं वाच फारच अध्यात्मिक वाचावंच वाटलं तर आपलं अभय बंगांचं लिखाण वाचत जा. ज्ञानोबा तुकोबा कशाला वाचायचे????
" कुनीतरी, आवंऽऽ कुनीतरी, कुनीतरी, याला सांगा जावा की आप्लं, वय काय झालंच नाऽऽऽऽऽऽही (संदर्भ- माझ्या लग्नाची होऽऽऽ का तुम्हास पडली घाऽऽई - नांवाचे मराठी गीत)".. असा "दादागिरी" करत कळकळीचा उपदेश करत असतो. मला Dear अंतोबा घेऊन जात असतो कवी संमेलन अथवा मुशायरा ऐकायला... उर्दू भाषेचे आपले साताजन्माचे वावडे त्यास कारण अज्ञान!!! अज्ञानातूनच विनाकारण वैर उपजत असते.. असोऽऽ

बरे झाले "मै शायर तो नहींऽऽऽ, नाहीतर कितीतरी रसिकांनी शमा-ए-मेहफिल ला हमेशा हमेशा के लिये, खुदा हाफिज केला असता!"

अंतोबा ला मग मी घेऊन जात असतो, रमेश च्या गाडीवर..
छ्य़ाऽऽऽ पाणीपूरी काय, प्लेटमध्ये at a time खायची वस्तू?????? आज्ज्ज्ज्जिबाऽऽऽत नाय.छ्याऽऽऽ छ्याऽऽऽऽऽ.. गाडीजवळ जावं, बा-अदब बा-मुलाहिजाऽऽ उभं रहावं. बोलेतो विनम्रतासे मामूऽऽ.

हातात एक प्लॆट घ्यावी.अन मग पुरी चा "रदिफ" आणि पाण्याच्या "काफिया", त्यात चिरलेल्या कांद्याचा दर्द... मुशायरा अस्स्स्स्साऽऽऽऽ की माशाल्लाऽऽऽऽ, पाणीपूरी एकापाठोपाठ एक खावी. एकदाच सर्व पु-यांमध्ये पाणी ओतून सर्व्ह करणा-या पाणीपूरीवाल्या च्या दारात जावू नये कधी...

अंतोबा सोबत जो मुशायरा ऐकत होतो, त्याच्या ओळी पाणीपूरी खाताना आठवल्या...

दुनिया कुछ ऐसी की, दर्द और फरियाद साथ साथ..
मर्ज भी कायम रहे, और जिंदा रहे बीमार भी!

भावार्थ-( Pls आमचे कॉपीराईट्स विसरू नका राव)- पाणीपूरी म्हणजे जीवन. तिखट पाणी म्हणजे "मर्ज" आणि गोड पाणी म्हणजे "जीने की चाह"

नूरे खुदा से नहींऽऽ तू जुदा बंदे
बस बंदगी की राह में मिटा दे "खुदी" को..

भावार्थ(ते कॉपीराईट्स चं विसरू नका)-
पाणीपूरी खात असताना देहभान हरपून खा. आपल्याच जीभेत असलेल्या चवीची मग ओळख होते. तुझे आहे, तुजपाशीऽऽऽ..

फिर न रहेगा मर्ज, ना मरहमोंकी चाह...
ना रहेगी बेकारारी, न रहेगी, लबोंपर आह...

(भावार्थ- णम्र इनंती की आमचे गरीबाचे कॉपीराईट्स इसरू णय़ॆ! धण्यवाद, येकदम ऍड्व्हान्समंदी) असोऽऽ

वरील शेर चा भावार्थ- तिखट लागले की अधून मधून एकांताची सुकी पुरी खायची. बच्चे कंपनीबरोबर दंगामस्ती करायची. म्हाता-या माणसाला वाटेने चालताना आधार द्यावा. आपला मी-पणा, अहंकार, म्हणजे एक" त्या अहंकाराचा लोप होतो म्हणजेच "एकांत"!!! असोऽऽऽ

शेवटचा शेर(प्लीज कंटाळूऽऽ नका आणि कॄपया टाळू पण नका)- असोऽऽ, शेर ऐकवतो..

खुदी के नकाब को आहिस्ता आहिस्ता, रफ्ता रफ्ता, कर दूर!
नूर जो दिलमें रक्खा है वही फैला है हर जर्रे में, हर मकामपर..

भावार्थ- ( जनाब वो अपनी कॉपीराईट्स की गुजारिश याद रहे)
जशी जशी पाणीपूरी जीभेवर रूळत जाते तसे तसे जाणवते की तिच्या चवीवे सौंदर्य खरे तर जीभेवर आहे, त्या पुरीत नाही.. आजची पुरी उद्या तर अशी काही बुरसटून जाते की खावी वाटत नाही. आपण म्हणून "क्षणस्थ" व्हावं आणि चवीचा आस्वाद घ्यावा. मुख्य म्हणजे चव आपल्या जीभेत असते हे विसरू नये.

ता. क.- आमचे तेवढे कॉपीराईट्स चे पण विसरू नये. मराठवाड्यात प्रकाशक नसतात अन "पुन्याला न्हाय तर म्हमईला हे घिऊन जावं मनलं तर तितं कुन्यातरी e-चारवंतानं आदीच क्लेम हानलेला आस्तोऽऽ"..

हॅप्पी पाणीपूरी--- C ya.. Bye.

1 comment:

रमण ओझा said...

माझे पत्रकार मित्र श्री महेश म्हात्रे यांनी जीभेचे चोचले वाचून मला त्यांची प्रतिक्रीया ऑर्कुटवर स्क्रॅप ने पाठवली. त्या प्रतिक्रीयेची मांडणी या लेखनाचा जसा बाज आहे त्या अंगानेच होती. ती मी इथं पोस्ट करत आहे.

प्रिय रमण,
तुझे जीभेचे चोचले साइट वरचे लिखाण वाचले, मजा आली. तुझ्याकडे एक छान शैली आहे ती विकसित कर.माझ्या तुझ्या लेखनाला आणि भावी जीवनाला मनःपूर्वक शुभेच्छा!

तू पाणीपूरी विषयी छान लिहीलेस.पण एक गोष्ट सांगू का? जरा विचार कर पाणीपूरी मध्ये गोड, तिखट आंबट चव असते का? जर तशी तिची चव असती,तर ती ज्या वाटीतून आपल्याकडे येते,त्या वाटीला किंवा प्लेटला पण तिची चव येत असेल... नाही ना? मग ती तुम्हा आम्हालाच का चविष्ट लागते? जो माणूस ती बनवतो, त्याला तिची गोडी, तिखटपणा का जाणवत नाही? फक्त तोंडात पडल्यावरच तिची चव का जाणवते? मग तू म्हणशील माझ्या जीभेवर चव आहे. मग जीभेवर चव असेल तर बाहेरची बासुंदी, पाणीपूरी, धपाटे काही खाण्याची गरज नाही!

पण याचे उत्तर असे की पाणीपूरी, बासुंदीची चव आणि जीभेच्या जाणीवेची जेव्हा युती होते तेव्हा तुम्हा आम्हाला खाण्याचा आनंद मिळतो.जेव्हा तन-मन, शरीर आत्मा यांची ओढ ईश्वराकडे लागते तेव्हा खरा आत्मानंद...नित्यानंद लाभतो. तो एकदा का तुमच्या तोंडाला लागला की नर-रक्ताला चटावलेला वाघ जसा दुस-या शिकारीला तोंड लावत नाही तसंच मन ऐहिक विषयांकडे ओढ घेत नाही...